देशाच्या इतिहासात सोन्याची विक्रमी भाववाढ

1490265882 wgc gold demand report 2016 india gold demand world gold demand trends india gold jewellery

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाच्या इतिहासात सोनं पहिल्यांदाच प्रतितोळ्यासाठी ४३ हजार रुपयांच्या पार गेले आहे. सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

 

सोन्याच्या भावात मागील आठ दिवसांत जवळपास १५०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीचा भावांतही वाढ झाली आहे. लग्नसराईमुळे पुढील काही दिवसांत सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचा भावांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आज राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७०० रूपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ४३,१७० रूपयांवर पोहचला. कोरोना व्हायरसमुळे जागतिक बाजारात निर्माण झालेल्या अस्थैर्यामुळे सोन्याकडे वळलेली गुंतवणूकदारांची नजर यामुळे सोन्याचे भाव कडाडल्याचे बोलेले जात आहे. बुधवारी मुंबईसह देशातील अनेक प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम सरासरी ४५० रुपयांनी वाढ झाली. तर चांदीचा भावही किलोमागे ५०० ते १,००० रुपयांनी वधारला. गुरूवारी चांदीचा दर प्रतिकिलो ४८,६०० रूपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रूपयांची किंमत घसरल्यामुळेही सोन्याच्या दरात वाढ झाली असावी, असा अंदाज आहे.

Protected Content