भडगाव प्रतिनिधी । लोकमान्य टर्मिनल्स वरुन दरभंगाला जाणारी (११०६१) अप लोकमान्य टिळक टर्मिनल-दरभंगा पवन एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दिड तासापासून नगरदेवळा रेल्वे स्टेशन येथे पवन एक्सप्रेस उभी आहे.
पाठिमागुन येणाऱ्या सर्व गाडया उशीराने धावत आहे. तसेच या रेल्वे स्टेशनला पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे खुप हाल झाले. गाडी लेट झाल्यामुळे प्रवशांनकडुन रेल्वे प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.