कासोद्यात क्षयरोग जनजागृतीपर प्रभात फेरी

WhatsApp Image 2020 02 18 at 11.23.31 PM

कासोदा प्रतिनिधी। प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समितीतर्फे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम क्षयरोग पथक एरंडोल यांनी शासकीय प्राथमिक आश्रमशाळा कासोदा येथे क्षयरोग जनजागृतीपर विद्यार्थ्यांसह प्रभात फेरी काढली.

डॉक्टर्स यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. क्षयरोग होण्याचे कारण सांगितले व त्या पासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात हे ही त्या प्रसंगी ता. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिरोज यांनी सांगितले. तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. निशाद शेख यांनी क्षयरोग ही भारतातील गंभीर आरोग्य समस्या आहे याचा नायनाट व्हावा म्हणून सर्वांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे गरजेचे असल्याचे सांगितले . तर डॉक्टर पृथ्वीराज वाघ यांनी हे क्षयरोग हा हवेमार्फत पसरणारा संसर्गजन्य आजार असून दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, रात्रीचा येणारा ताप /घाम , वजनात लक्षणीय घट, भूक मंदावणे, थुंकी वाटे रक्त पडणे , मानेला आलेल्या गाठी इत्यादी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी प्रा.आ. केंद्र कासोदा येथे तपासणी करून घेण्याचे सांगितले. क्षयरोग पर्यवेक्षक पारोळा येथील विजय मिस्तरी यांनी एमडीआर टीबी चे लक्षणे कारणे व औषध उपचाराविषयी मार्गदर्शन केले.

आरोग्य सहाय्यक नन्नवरे यांनी क्षयरोग व एच.आय.व्ही. एड्स आजाराबाबत सखोल मार्गदर्शन करून रुग्णांना मिळणारा मोफत औषधोपचार व पोषण आहार योजनेबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा पाटील होत्या. सूत्रसंचालन सूर्यवंशी सर यांनी केले तर सोनवणे मॅडम यांनी आभार मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्र.शाळा तंत्रज्ञ निलेश माळी, शाहिद मुल्लजी, शिरसाट, आरोग्य सेवक आर एस पाटी , भुरे, सैंदाणे, दिपक भडांगे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Protected Content