रावेर पिपल्स बँकेचे चेअरमनपदी पंकज पाटील बिनविरोध

raverbank

रावेर प्रतिनिधी । रावेर शहरातील दि पिपल्स को.ऑ.बँकेच्या चेअरमनपदी पंकज राजिव पाटील तर व्हाईस चेअरमनपदी अरुण सिताराम महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बँकेच्या सभागृहात आज विशेष सभा संपन्न झाली यामध्ये पंकज पाटील यांची चेअरमन साठी तर अरुण महाजन यांची व्हाचेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी एस एफ गायकवाड यांनी केले.

यावेळी संजय वाणी, सूर्यभान चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, सोपान पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, शंकर राऊत, ॲड.जे.जी.पाटील, जर्नादन पाचपांडे, बिसन सपकाळ, प्रल्हाद महाजन, अॅड. प्रवीण पाचपोहे, मॅनेजर प्रकाश पाटील उपस्थित होते. यावेळी निवड होताच आमदार शिरिषदादा चौधरी, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, पदमाकर महाजन, हरीष गनवाणी, तुकाराम बोरवले, उमेश महाजन ,राजिव पाटील आदिंनी नवनिर्वाचीत चेअरमन, व्हा.चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.

Protected Content