जळगाव प्रतिनिधी । येथील लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आजच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली.
येथील लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती गठीत करण्यात आली असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची सर्वानुमते महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. समितीच्या कार्याध्यक्ष-रवी देशमुख, उपाध्यक्ष विष्णू भंगाळे, फारुख शेख, भगत बालाणी, साजिदभाई शेख, जयश्री पाटील, प्रसिद्धी प्रमुख भारत ससाणे, संजय तांबे, खजिनदार प्रमोद बळीराम पाटील व समन्वयक मनोहर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने सर्व जातीधर्माच्या नागरीकांच्या सहभागाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवाचा मिरवणुकीचा प्रारंभ पालक मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मिरवणुकीची सुरवात दुपारी ३.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल येथून राजांच्या प्रतिमा पूजन शिवपूजन करून होणार आहे. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल ते कोर्ट चौक मार्ग नेहरू चौक, टॉवरचौक, चित्र चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिवतीर्थ मैदान येथे विसर्जित होणार आहे. या मिरवणुकीत ढोल ताशे, लेझीम पथक, पारंपारिक आदिवासी नृत्य हे वैशिष्ट राहणार आहे.
दरम्यान, शिवजयंती पासून ते शहीद भगतसिंग, सुकदेव, राजगुरू यांच्या २३ मार्च २०२० रोजीच्या शहादत दिनापर्यंत सार्वजनिक जयंती महोत्सव समिती विविध कार्यक्रम घेणार आहे. त्यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महिलासाठी प्रश्न मंजुषा स्पर्धा, युवकांच्या निबंध स्पर्धा, चौथी ते सातवीतील मुलांसाठी गड किल्ले बनवणे स्पर्धा व ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित महिला मेळावा घेण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने देशाच्या चुकीच्या शेती धोरणामुळे शेतकर्याच्या आत्महत्या मोठ्या संख्येने होत आहे. राजाच्या शेती धोरणाचा आदर्श शेतकर्यांना व्हावा यासाठी शिवाजी महाराजांची रयतेप्रती असलेली तळमळ व शेती धोरण शेतकर्यांना प्रेरणादायी ठरणारी विचार मांडले जाणार आहेत. या पत्रकार परिषदेला मार्गदर्शक प्रतिभाताई शिंदे, विनोद भाऊ देशमुख, विष्णू भंगाळे, फारुख शेख, भारत ससाणे, रवी देशमुख, भगत बालाणी, साजिद शेख, जयश्री पाटील, प्रमोद बळीराम पाटील, अजय बढे, विजय भास्कर पाटील, अजित पाटील,इबा पटेल व
विजय देसाई, नंदु पाटील, अनिल अडकमोल, संजय पवार, अमोल कोल्हे, संजय तांबे, अॅड. गोपाळ जळमकर, राजेंद्र चव्हाण, सचिन धांडे, मानसिंग सोनवणे, विकास चौधरी, प्रसाद जोशी, कुणाल साळुंखे, मिलिंद सोनवणे, योगेश रमेश पाटील, हितेश पाटील, भरत बेंडाळे, भाग्येश पाटील आणि सुधाकर जाधव, भारत सोनवणे, यांच्यासह लोक कल्याणकारी उपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे
पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.