जि.प. मराठी शाळा ग्राम विकासाचे महत्वाचे केंद्र : रोहन पाटील

f5977d53 6bda 477f 9487 6a681597ca21

 

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील शेळावे केंद्रातील सर्वच शाळा गुणवत्तेच्या बाबतीत उत्तम कार्य करीत असून जि.प. मराठी शाळा ग्राम विकासाचे महत्वाचे केंद्र असल्याचे मत जि प सदस्य रोहन पाटील यांनी व्यक्त केले. ते शेळावे बु॥ येथील केंद्र शाळेतील  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

तालुक्यातील केंद्र शाळा शेळावे बु॥ येथे गावाचे नागरिक कैलास राजेंद्र पाटील उर्फ बंटीभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त १२० विद्यार्थांना वहया व पेन वाटपाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जि प सदस्य रोहन सतिषराव पाटील व प्रमुख पाहुणे म्हणुन जि.प. सदस्य हिंमतराव पाटील, शेळावे केंद्र प्रमुख जितेंद्र पवार, पारोळा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष गुणवंतराव पाटील, पत्रकार डॉ महेंद्र सांगळे, मधुकर बापु पाटील, पत्रकार रविंद्र पाटील यांच्यासह परशुराम पाटील, नितिन पाटील, प्रविण पाटील, गणेश निकम, विशाल पाटील, राकेश बिऱ्हाडे, विकास पाटील, निखिल पाटील, सागर पाटील, सागर पाटील, .शुभम पाटील, धनराज पाटील, सतिष पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थीत होते. वरील सर्व मान्यवरांचे शाळेकडून स्वागत व मान्यवरांच्या हस्ते विदयार्थ्यांना वहया व पेन वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहन पाटील यांनी बंटी पाटील यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन करुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व जि प मराठी शाळा या ग्रामिण विकासाचे महत्वाचे केंद्र असूनन त्या लोकसहभागातुन जास्तीत जास्त सक्षम झाल्या पाहिजेत. हिंमतराव पाटील म्हणाले की, शेळावे केंद्रातील सर्वच शाळा गुणवत्तेच्या बाबतीत उत्तम कार्य करीत असुन केंद्र प्रमुख जितेंद्र पवार उत्कृष्टपणे आपल्या कामाची धुरा सांभाळत आहेत. केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांनी जि प सदस्य हिंमतराव पाटील यांनी शेळावे बु॥ शाळेला कुंपणासाठी दोन लाख निधी उपलब्ध करून दिला म्हणुन त्यांचे विशेष आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक जितेंद्र पवार तर आभार प्रदर्शन हेमराज राजपूत यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी शशिकला बोरसे, भारती पाटील, जयश्री पाटील यांचे सहकार्य लाभले .

Protected Content