राजकीय, राष्ट्रीय

पुलवामा हल्ल्यावरून राहूल गांधींचे शरसंधान

शेअर करा !

Rahul gandhi 1 1

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केंद्र सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.

  • advt tsh flats
  • spot sanction insta

आज पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. राहुल यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल तीन प्रश्‍न उपस्थित केले आहेत. या ट्विटमध्ये राहूल गांधी म्हणाले आहेत की, ”पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला? या हल्ल्याच्या तपासातून काय निष्पन्न झालं? ज्या त्रुटींमुळे दहशतवादी झाला, त्यासाठी भाजपा सरकारमधल्या कोणाला जबाबदार धरण्यात आलं?,” असे प्रश्‍न राहुल यांनी उपस्थित केले आहेत.