राजकीय, राज्य

चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड

शेअर करा !
chandrakant patil
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची तसेच आमदार मंगलप्रभात लोढा यांची मुंबई अध्यक्षपदी पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी ही घोषणा केली.

  • spot sanction insta
  • advt tsh flats

 

राज्यातील फडणवीस सरकार सत्तेतून गेल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद बदलण्याची चर्चा होती. प्रदेशाध्यक्षपदासाठी सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रेशखर बानवकुळे यांची नावे चर्चेत होती. मात्र चंद्रकांत पाटील अमित शाहांच्या जवळचे असल्यामुळे पाटील यांचीच पुन्हा वर्णी लागली. तर मंगलप्रभात लोढा यांनाही बदल नको म्हणून पदावर कायम ठेवण्यात आले.