पारोळा, प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा यांच्या वतीने श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंती उत्सव निमित्ताने चर्मकार समाज मेळावाचे आयोजित करण्यात आला होते. यावेळी चर्मकार समाज मेळावा संघटनेचे राष्टीय कार्यध्यक्ष भानुदास विसावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
भानुदास विसावे यांनी अध्यक्षीय भाषणात समाज संघटनाचे महत्व विषद केले. तसेच एकंदरित देशभर समाजाचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर असलेला संपर्क अनुभव यावर जबरदस्त असे मार्गदर्शन समाज बांधवांना व भगिनिंना मिळाले. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या कर्तृत्वबाबत भानुदास विसावे यांनी सविस्तर माहिती दिली. संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष समाज भुषण पांडुरंग बाविस्कर यांनी देखील विचार मांडले. या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष उत्तम मोरे , कर्मचारी अधिकारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बी. बी. मोरे ,राज्यमहिला उपाध्यक्ष जयश्री विसावे,महानगराध्यक्ष भारती बविस्कर, महीला जिल्हा अध्यक्षा सुनीता लिंडायत, सरला सावकारे व सर्व कार्यकारणी कार्यक्रमासाठी उपस्थित होती. विशेष म्हणजे धरणगाव नगरीच्या उपनगराध्यक्षा अंजली विसावे यांनी जयंती उत्सवानिमित्त सर्व आलेल्या समाज बांधव व भगिनीनी मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमसाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल वाघ यांनी सूत्रसंचालन केले. आयोजक पारोळा तालुका अध्यक्ष लक्ष्मण महाले, युवा अध्यक्ष मंगेश मोरे, शिक्षक आघाडी चे तालुका अध्यक्ष नितीन ठाकरे, शिक्षक आघाडीचे उप अध्यक्ष सुभाष चिमणकारे, अधिकारी कर्मचारी तालुका अध्यक्ष संजय अहिरे, जयंती उत्सव समिती उपाध्यक्ष कैलास महाले,खजिनदार समाधान ठाकरे, अशोक मोरे, रतिलाल मोरे,संजय उशीर, सतिष वाघ, प्रमोद मोरे, रविद्र ठाकरे, आनंद नेरकर व सर्व पारोळा तालुका कार्यकारणी समाज बांधव भगिनिनि यांनी कामकाज पहिले.