मुंबई वृत्तसंस्था । अभिनेत्री मानसी नाईक छेडछाड प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. साऊंड असिस्टंट अजय कल्याणकर याला पुण्यातील स्वारगेट भागातून अटक केली आहे.
साऊंड असिस्टंट अजय कल्याणकर असे संशयित आरोपीचे नाव आहे. पुण्याच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपल्याशी गैरवर्तन झाल्याची तक्रार मानसीने मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. शिरुर तालुक्यातील रांजणगावात हा प्रकार घडल्याचा आरोप मानसीने केला होता. मुंबईतील तक्रार रांजणगाव पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली. त्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी एक पथक तयार करुन आरोपीची धरपकड केली. शिरुर न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, मानसी नाईक छेडछाडप्रकरणी तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. डॉ. पोटे आणि त्यांच्या पत्नीने फोनवरुन आपल्याशी वाद घातल्याचे मानसीने सांगितले होते.