कासोदा प्रतिनिधी । येथील मुस्लिम समाजातील २६ वर्षीय युवकाने समाजापुढे एक आदर्श उभा ठेवला आहे. सारखपुडा झाल्यानंतर नवरीमुलीला कॅन्सरच्या आजार जडल्याने सर्वांनी लग्नाची आशा संपविली होती. मात्र नवरदेवाने सर्वांच्या आशा पल्लवीत करत ठरल्याप्रमाणे त्याच मुलीशी लग्न करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
याबाबत माहिती अशी की, ए.टी.डी.हायस्कूलच्या पाठीमागील इंदिरा नगर येथील रहिवासी तौसीम खान यांचा आपल्या मामाची मुलीगी गुलनाज खान सोबत २०१८ मध्ये साखरपुडा झाला होता. त्यांच्ये लग्न ठरल्याप्रमाणे फेब्रुवारी २०२० मध्ये होणार होते. परंतु २०१९ मध्ये काळाच्या ओघात ओढत गुलनाज खान यांना डाव्याबाजूच्या दंडात दुखू लागले. स्थानिक पातळीवरील दवाखान्यात जाऊन दाखविले असता. त्यांना मुंबईतील हिंदुजा हॉऊसस्पिटल येथे चेकिंगसाठी पाठविले तेथील डॉ. यांनी मुलीला दंडातील हडात कँसर असल्याचे सांगितले. त्यांनी न डगमगता मुलीच्या आईवडिलांनी परिस्थिती गरिबीची असलेतरी शस्रक्रीया करण्यास सांगितले. शस्रक्रिया यशस्वी झाली होती. मुलीच्या हाडातील दुखणे पूर्णपणे गेले होते. परंतु ६ महिन्या नंतर पुन्हा मुलीच्या पाठीच्या मणक्यात कँबरेच्या वर त्रास होऊ लागल्याने तिला पुन्हा त्याच दवाखान्यात चेकिंग साठी नेले असता . डॉक्टरांनी तिला पुन्हा तेथेही हाडात कॅन्सर असल्याचे सांगितले. पण आता हे दुखणे बरं होणे शक्य नाही असेही ते म्हणाले जितके दिवस जातील तितक्याच दिवसाची मुलगी सोबती असल्याचे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले. नवरी मुलीला दुःखाने काळाच्या ओघात ओढले होते. घरची परिस्थिती बिकट असल्याने व आजार पणाने मुलीचे दोघेही पाय निकामी झाले आहेत . ती जागेवरून दुसऱ्याच्या साहाय्याशिवाय जागेवरून सरकुही शकत नाही. अशा परिस्थितीत असूनही येथील युवक तौसीम खान यांनी ७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या विवाहाची तारिक जवळ आली असल्याने. माझी पत्नी आहे आणि तिला मी लग्न करून माझ्या घरी घेऊन जानार असल्याचे सांगत. तौसीम खान यांनी आज ९ फेब्रुवारी रोजी समाजा पुढे आदर्श ठेवत पीडित मुलगी आजाराने ग्रासलेल्या अवस्थेत असूनही तिच्याशी मुस्लिम समाजाच्या शासरोक्त पध्दतीने लग्न करून घेतले. याप्रसंगी सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले होत.