नगरदेवळा येथे रिक्षा चालकाने सापडलेली बँग केली परत

4560082a 2c1f 49aa 9949 63405cc194e3

भडगाव, प्रतिनिधी | समाजात माणुसकी शिल्लक असल्याचा प्रत्यय वेळोवेळी आपणास येत असतो. याचा प्रत्यय नगरदेवळा स्टेशन येथील रिक्षाचालक गौतम संसारे याने तळई येथील कैलास संभाजी वाघ यांची महामार्गावर मोटारसायकल वरून पडलेली बँग प्रामाणिकपणे परत केल्याने नुकताच आला.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गौतम संसारे नेहमीप्रमाणे पहाटे ४.३० वाजता रिक्षाचा नंबर लावण्यासाठी येत असताना त्यास उड्डाण पुलावर भरलेली मोठी बँग दिसली. त्याने ती उचलून पाहिली असता त्यात लग्नाचे नविन कपडे, लग्नपत्रीका व पैसे आढळून आले. गौतम याने पत्रिकेतील फोन नंबरवर संपर्क साधला. तेव्हा बँगमालक तळई येथील असल्याचे समजले, ते बँगेचाच शोध घेत होते. त्यांना त्वरीत नगरदेवळा येथे परत बोलावून गौतम याने त्यांना बँग सुपूर्द केली. यावेळी बँग मालक व प्रवाशांनी रिक्षाचालकाचे कौतुक केले.

Protected Content