जळगावात ‘आशा’ दिनानिमित्त गुणगौरव सोहळा उत्साहात

6b982546 9853 4b4a 8c41 93decd6974a9

जळगाव, प्रतिनिधी | “आशा” म्हणजे आरोग्य विभागाचा पाया आहेत. “आशा” कर्मचारी नसून त्या खऱ्या अर्थाने आरोग्य दूत व सामाजिक कार्यकर्त्या आहेत. रूग्णांना उपपचारपर्यत पोहचवण्याचे व रूग्णांचे आसू पुसण्याचे “पुण्य काम” आशा सेविका करतात. या आशा सेविकाचे मानधन वाढविण्यासह त्यांच्या मोफत पास सवलतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री ना.पाटील यानी आज (दि.८) येथे दिले.

 

उत्कृष्ट आशा स्वयंसेविकाचा सत्कार !
तालुक्यात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या मोनिका चव्हाण (म्हासावद), वनिता शिंदे (रोटवद), सरला वाणी (नशिराबाद), आशा मानके, पुष्पा पट्यार (सोनवद), भारती कचरे (नशिराबाद) या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. “आशा” दिनानिमित्त जळगाव व धरणगाव तालुक्यातील सुमारे ४०० आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक उपस्थित होते. यावेळी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा विविध गुणगौरव कार्यक्रम पार पडला. यात रांगोळी स्पर्धा, नाटिका, गीत गायन स्पर्धा, विविध उखाणे तसेच स्वच्छता व आरोग्य याबाबत पथ नाट्य विनोद ढगे व सहकार्यांनी सादर केले.

व्यासपीठावर जळगाव पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील, धरणगाव पं.स. सभापती मुकुंदराव नन्नवरे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोळे, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, गटशिक्षणाधिकारी स्नेहल कुडचे, पं. स. सदस्य हर्षल चौधरी, जना कोळी, तुषार महाजन, मिलिंद चौधरी, रमेश पाटील, पंकज पाटील, डॉ. कमलाकर पाटील, शिवराज पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय सोनवणे, डॉ. संजय चव्हाण, मुकेश सोनवणे, संजय घुगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समूह संघटक प्रविण जगताप यांनी केले. प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय चव्हाण यांनी केले तर आभार धरणगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय सोनवणे यांनी मानले.

Protected Content