फोन टॅपींग चुकीचेच ! : आमदार चंद्रकांत पाटील

chandrakant patil muktainagar

रावेर प्रतिनिधी । राज्यातील कुणा नेत्यांचे फोन जर टॅप होत असतील तर हा प्रकार चुकीचाच असल्याचे स्पष्ट मत आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.

कालच एका इंग्रज वर्तमानपत्राने तत्कालीन फडणवीस यांच्या सरकारच्या कालखंडात विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांसह भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा फोन टॅप झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. या पार्श्‍वभूमिवर, आज मुक्ताईनगरचे आमदार तसेच खडसे यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आमदार चंद्रकांत पाटील रावेर येथे आले होते. त्यांना या प्रकरणी विचारणा केली असता आमदार पाटील म्हणाले की, अशा प्रकारे कुणाचेही फोन टॅप करणे हे चुकीचेच असून या प्रकरणी चौकशी होण्याची गरज आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीने एकत्रीतपणे जिल्हा बँक निवडणूक लढविण्याचे ठरविले तर आपण स्वत: मुक्ताईनगरमधून रिंगणात उतरणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी दिली. याप्रसंगी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपन पाटील,शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन,शिवसेना युवाजिल्हा प्रमुख अविनाश पाटील,माजी नगराध्यक्ष रमेश महाजन,सुधाकर महाजन,गोपाळ सोनवणे,अरुण महाजन यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content