नवी दिल्ली । श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला केंद्र सरकारमार्फत एक रुपयाचे दान देण्यात आले आहे. ट्रस्टला मिळालेले हे पहिले दान आहे.
कालच पंतप्रधान मोदी यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा केली होती. यानंतर आज सरकारतर्फे या ट्रस्टला एक रूपांचे दान देण्यात आले आहे. केंद्र सरकारने हे दान गृह मंत्रालयाचे सचिव डी. मुर्मू यांच्यामार्फत दिले. ट्रस्ट स्थावर मालमत्तेसह कोणत्याही अटीशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून दान, अनुदान, योगदान घेऊ शकणार आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने ५ फेब्रुवारीपूर्वी ट्रस्ट स्थापन करावा तसेच मुस्लिमांना मशिदीसाठी अयोध्येत ५ एकर जागा द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार केंद्र सरकारने काल मश्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रफ ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा केली. याचबरोबर, उत्तर प्रदेश सरकारने रामजन्मभूमीपासून २० ते २५ किमी अंतरावर मुस्लिमांना मशिदीसाठी ५ एकर जमीन देण्याचे ठरविले आहे. या मंदिराचा शिलान्यास करतांना देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.