२० तारखेनंतर लॉकडाऊन शिथील करण्यावर विचार-मुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी । सहा महिन्यांचे बाळ आणि ८३ महिन्यांची महिला ही कोरोनावर मात करू शकते असे नमूद करत आपण ही लढाई जिंकणारच असा आत्मविश्‍वास आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यावर २० तारखेनंतर विचार करण्यात येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज रात्री राज्यातील जनतेशी संपर्क साधला. त्यांनी प्रारंभीच बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. भीम सैनिकांनी गर्दी न केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. कोरोना विरूध्द लढाईत राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनची मर्यादी वाढली असली तरी जीवनावश्यक बाबींचे वाहतूक व उपलब्धता सुरूच राहणार आहेत. तर राज्यात २० तारखेनंतर नेमकी कोणत्या क्षेत्रात शिथीलता देण्यात येईल याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालील मंत्र्यांचा एक गट काम करत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

याप्रसंगी उध्दव ठाकरे म्हणाले की, कोरोनाचा प्रकोप गंभीर असला तरी यावर विजय मिळवणे शक्य आहे. आज आपण सहा महिन्यांच्या बालकाच्या आईशी बोललो असून या बालकाने कोरोनावर मात केली आहे. तर यासोबत कोरोनापासून मुक्त होऊन घरी परतलेल्या ८३ वर्षांच्या महिलेशी देखील आपण बोलल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य सरकार कोरोना विरूध्द चांगली लढाई देत आहे. आजच टास्क फोर्सची निर्मिती करत असल्याचे नमूद करत त्यांनी अन्य उपाययोजनांची माहिती दिली. तर सुमारे सहा लाख परप्रांतीय मजूरांची व्यवस्था राज्य सरकारने केलेली आहे. तथापि, बांद्रा येथील घडलेला प्रकार दुर्दैवी असून इतर प्रांतातील लोकांनी काहीही घाबरण्याची आवश्यकता नाही. उलट या संकटाच्या क्षणात आपण सोबत प्रतिकार करू असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी केले. यात राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा देखील त्यांनी केला.

Protected Content