जळगाव प्रतिनिधी । महाविद्यालयीन जीवनात नाटकात केलेली पुढार्यांची भूमिका आज कामी येत आहे असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवारंग कार्यक्रमाच्या उदघाटना प्रसंगी केले.
युवारंगा कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी ना. गिरीष महाजन यांनी केले यावेळी त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील अनेक गंमती जमती सांगितल्या. यात ते म्हणाले की, मी कॉलेज जीवनात नाटकात पुढार्यांची भूमिका केल्या होत्या. याच भूमिका आता कामा येत असल्याचे ना. महाजन यांनी म्हणताच हास्याची लकेर पसरली. याप्रसंगी त्यांनी युवकांना व्यसनमुक्त राहण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सत्यजित सावळे यांनी केले. युवारंगचे कार्याध्यक्ष दिलीप पाटील, कुलगुरूडॉ पी पी पाटील ,आमदार राजुमामा भोळे यांची भाषणे झालीत. प्रा अजय पाटील यांनी आभार प्रदर्शन केले सूत्रसंचलन प्रा गयास उस्मानी व प्रा आशुतोष पाटील यांनी केले.