माझ्याकडे कोणत्याही प्रकारची पदवी नाही : राज ठाकरे

Raj 2

पुणे (वृत्तसंस्था) शिक्षणासाठी पदवी लागते. कलेला पदवी लागत नाही. माझ्याकडे कोणत्याही प्रकारची पदवी (डिग्री) नाही, असा खुलासा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ‘इंक अलाइव्ह’व्यंगचित्र कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

 

झील इन्स्टिट्यूट पुणे आणि कार्टूनिस्ट कंबाईन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘इंक अलाइव्ह’ व्यंगचित्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उदघाटन प्रसिद्ध व्यंगचित्रकार व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, शिक्षणाला डिग्री लागते. पण कलेला कोणत्याही प्रकाराची डिग्री लागत नाही. माझ्याविषयी सांगायचे झाल्यास मला राजकीय व्यंगचित्र शिकायचे होते. त्यामुळे मी मधूनच शिक्षण सोडले आणि जे. जे. आर्ट ऑफ स्कूलमध्ये व्यंगचित्र शिकलो. त्यामुळे माझ्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नाही आणि मला कोणीही डिग्रीबद्दल आतापर्यंत विचारले नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, व्यंगचित्रकार चारूहास पंडित, जयेश काटकर उपस्थित होते.

Protected Content