धरणगाव, प्रतिनिधी | येथील नगर परिषदतर्फे आज शुक्रवार रोजी महान संत जगद्गुरु तुकाराम महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळ शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
नगर परिषदतर्फे जगद्गुरु तुकाराम महाराज, जयंतीनिमित्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, भागवत चौधरी, विलास महाजन, नंदकिशोर पाटील, जितेंद्र धनगर, किरण मराठे, माजी नगरसेवक अभिजीत पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन,शहर संघटक धिरेंद्र पुरभे, भारतीय विद्यार्थी सेनेचे विशाल महाजन, बालू जाधव, विलास माळी, राहुल रोकडे, अरविंद चौधरी, लक्ष्मण महाजन, भाजपचे गटनेते कैलास माळी, गुलाब मराठे, काँग्रेस जळगाव ग्रामीण अध्यक्ष चंदन पाटील, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गोपाल पाटील, पंढरीनाथ महाजन, विनोद रोकडे, जयेश महाजन, नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक संजय मिसर अनिल पाटील, नगरसेवक व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.