भुसावळ प्रतिनिधी – बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटनातर्फे नागरीकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरीरकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी बुधवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती मात्र व्यापार्यांनी बंद झुकारून प्रतिष्ठाने सुरू ठेवल्याने काही कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील आर्य निवासवर दगडफेक केल्याने दुकानाच्या काचा फुटल्या तर काझी प्लॉट भागातही दगडफेक झाल्याने दैनिकाचे छायाचित्रकार कमलेश चौधरी यांच्यासह चौघे जखमी झाले. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शहराला भेट देत माहिती जाणून घेतली. शहरात कुठे हि अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलिप भागवत यांनी सहकाऱ्यांसह परीस्थिवर नियंत्रण ठेवले होते. शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
भुसावळात बंदला गालबोट; छायाचित्रकारासह चौघे गंभीर जखमी
5 years ago
No Comments