कासोदा येथे लिटिल व्हॅली स्कूलमध्ये ऋणानुबंध कार्यक्रम उत्साहात

kasosaa

कासोदा प्रतिनिधी – येथील लिटिल व्हॅली स्कूलमध्ये नुकतेच कासोद्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले वैद्यकिय अधिकारी यांच्या उपस्थितीत ऋणानुबंध उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ .पृथ्वीराज वाघ यांना केले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. पि.जी. पिंगळे व डॉ.जितेंद्र पाटील हे होते. डॉ. पि.जी पिंगळे यांनी १९९६ साली पासून केलेल्या विनामूल्य सेवेबद्दल कृतुज्ञता व्यक्त केली. त्याप्रसंगी डॉ. जितेंद्र पाटील व शाळेचे संचालक अशोक पाटील यांनीही आपले मत व्यक्त केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी डॉ. राजश्री वाघ यांनी डॉक्टरांनी आरोग्या बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी डॉ. सूचिता ठाकरे, डॉ. राजश्री वाघ, डॉ. डी.आर. पाटील, डॉ. अजय सोनी, डॉ. अशोक बियाणी, डॉ. अमोल शिंपी, डॉ. महेश पाटील, डॉ. जयेश ठाकरे, डॉ. मकरंद पिंगळे, डॉ. मोतीलाल पाटील, डॉ . नितीन पाटील, डॉ. राधिका पिंगळे यांच्यासह परीसरातील डॉक्टरर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वाती वारे हिने केले. तर प्रस्ताविक भावना शिंदे यांनी मांडले. आभार ललित पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका कासार, ललित पाटील, माधुरी चौधरी मॅडम व शाळेचे शिक्षेकतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content