Home राजकीय ‘ती’ कामे तुमचीच हे सिध्द करा- हरीभाऊ जावळे यांचे आव्हान

‘ती’ कामे तुमचीच हे सिध्द करा- हरीभाऊ जावळे यांचे आव्हान

0
90


रावेर प्रतिनिधी । मतदारसंघामध्ये केलेली कामे आघाडी सरकारच्या काळातील असल्याचे विरोधकांनी सिध्द करून दाखवावे असे खुले आव्हान आमदार हरीभाऊ जावळे यांनी आज दिले.

राष्ट्रवादी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आमदार हरीभाऊ जावळे आणि खासदार रक्षाताई खडसे यांच्यावर आरोप केले होते. आघाडी सरकारच्या कालखंडात झालेली कामे दाखवून हे दोन्ही मान्यवर जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तसेच हरीभाऊ जावळे यांनी मतदारसंघात विकासकामांबाबत केलेल्या दाव्यांवरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज रावेर येथे आयोजित केलेल्या बैठकीत आमदार जावळे यांनी विरोधकांना धारेवर धरले. संबंधीत कामे ही आघाडी सरकारच्या कालखंडात झाले असतील तर विरोधकांना खुले चॅलेंज आहे की त्यांनी ते सिद्ध करावे असे खुले आव्हान आमदार हरीभाऊ जावळे यांनी याप्रसंगी दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound