Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगर येथे “मेरा परिवार भाजपा परिवार” अभियान सुरु

मुक्ताईनगर येथे “मेरा परिवार भाजपा परिवार” अभियान सुरु


मुक्ताईनगर (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षातर्फे ” मेरा परिवार भाजपा परिवार ” अभियान राबविन्यात येत आहे, या अभियानाअंतर्गत आज आ.एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताई या निवासस्थानी स्वत: त्यांच्या हस्ते भाजपाच्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. खडसे म्हणाले की, देशाला नरेंद्र मोदी यांच्या रूपाने कणखर पंतप्रधान लाभले आहेत, आज भारत प्रत्येक क्षेत्रात सर्वांगीण प्रगती करत आहे, प्रगतीचा हा रथ असाच सुरू ठेवण्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाला केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार पुन्हा एकदा बहुमताने निवडुन येण्यासाठी प्रयत्न करायचे आहे व परत पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी संकल्प करायचा आहे. त्यासाठी भाजपतर्फे 12 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान ” मेरा परिवार भाजपा परिवार ” हे अभियान राबविन्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने आपल्या घरावर भारतीय जनता पक्षाचा ध्वज आणि स्टिकर लावायचे आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारच्या विविध योजना आणि विकास कामे जनतेपर्यंत पोहचविन्याचे आवाहनही केले. यावेळी मुक्ताईनगर भाजपा शहराध्यक्ष मनोज तळेले, भुसावळ माजी पं.स. उपसभापती गोलू पाटील, ख वि स सभापती प्रभाकर झोपे, कृ ऊ बा समिति संचालक प्रशांत पाटील, योगेश कोलते, सचिन बोरोले, पांडुरंग नाफडे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound