Home Cities जळगाव जळगावात क्षत्रिय माळी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन

जळगावात क्षत्रिय माळी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन

0
41

जळगाव प्रतिनिधी । येथील क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळातर्फे भव्य एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दिनांक १७ रोजी माळी समाज भवन, इंद्रनिल सोसायटी वाटीका आश्रमाच्यामागे जळगाव येथे आयोजीत करण्यात आलेले आहे.

या अधिवेशनाचे उदघाटन आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक चंद्रकांत कापसे, नीळकंठ देवचंद महाजन (अध्यक्ष क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ) व नानाभाऊ पोपट महाजन आदी उपस्थीत राहणार आहे. यार अधिवेशनात एन. एच. महाजन यांचा अहिराणी गोडवा हा समाज प्रवोधनपर कार्यक्रम, तसेच रक्तदान शिबीर, महिलांसाठी मोफत हिमोग्लोबीन तपासणी शिबीर, लहान मुलांसाठी सांस्कृतीक कार्यक्रम,वार्षिक सर्वसाधारण सभा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या अधिवेशनासाठी माळी समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थीती द्यावी असे आवाहन अध्यक्ष नानाभाऊ पोपट महाजन व सचिव प्रमोद कौतिक माळी तसेच क्षत्रिय माळी समाज सेवा जळगाव यांनी केलेले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound