यावल प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय मतदान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांकडून मतदार नोंदणीचे फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच ‘मतदान जनजागृती’ या विषयावर गणित विभागामार्फत ‘पोस्टर स्पर्धा’ घेण्यात आली.
उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी मतदान जनजागृती विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्या र्डॉ. संध्या सोनवणे यांनी विचार व्यक्त करून उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या मतदानाचे महत्व समजवुन सांगीतले या प्रसंगी त्या म्हणाल्यात प्रत्येकांनी मतदानाचा हक्क बजवावा. लोकांमध्ये जाऊन जनजागृती करावी. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता निस्वार्थपणे मतदान करा असे आवाहन केले. यावेळी महाविद्यालयाच्या पटांगणात मान्यवर व विद्यार्थी मिळून सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमास डॉ.एस.पी. कापडे, प्रा.एस.आर. गायकवाड,प्रा.आर.डी.पवार, प्रा.ए.एस. अहिरराव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुधा खराटे यांनी केले तर आभार प्रा.ए.पी.पाटील यांनी मानले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.