यावल प्रतिनिधी । असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असणार्या अट्रावल येथील प्रसिद्ध मुंजोबांच्या यात्रेला आजपासून प्रारंभ झाला आहे.
यंदा शनिवार २५ जानेवारी, सोमवार २७ जानेवारी, शनिवार १ फेब्रुवारी व सोेमवार ३ फेब्रुवारी असे मुख्य चार वार असून पौर्णिमेच्या दिवशी यात्रोत्सवाचा समारोप होईल. मुंजोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असल्याने प्रशासनातर्फे भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात एसटी महामंडळाने अतिरिक्त फेर्या उपलब्ध करून दिल्या आहेत. तर पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त राखण्यात आला आहे. यात्रोत्सवानिमित्त परिसरात चैतन्यदायी वातावरण असून येथे विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.