Home Cities यावल फैजपूर येथे उद्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाचे आयोजन

फैजपूर येथे उद्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाचे आयोजन


voters day

फैजपूर, प्रतिनिधी | भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार येथील जे.टी. महाजन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे उद्या (दि.२५) सकाळी १०.०० वाजता राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर कार्यक्रमांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची  प्रमुख उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमात उत्कृष्ट बी.एल.ओ., कॉलेज ब्रान्ड अम्बेसिडर आणि पत्रकार यांनी निवडणूक कामात हिरीरीने भाग घेतल्याने त्यांचा सत्कार केला जाणार आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीसंदर्भात दोन्ही तालुक्यांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेमधील विजेत्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू पी. पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत. तरी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी व मत नोंदणी अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे.


Protected Content

Play sound