जळगाव परिमंडळ, प्रतिनिधी | महावितरणच्या जळगाव परिमंडळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करतांना अधीक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) चंद्रशेखर मानकर, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) नेमिलाल राठोड, प्रणाली विश्लेषक विलास फुलझेले, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अमोल बोरसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर, कार्यकारी अभियंता नितीन पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) रामचंद्र वैदकर, कनिष्ठ विधी अधिकारी जीवन बोडके यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमुख लिपिक मधुसुदन सामुद्रे, धनराज करोसिया यांनी परिश्रम घेतले.