हैद्राबाद (वृत्तसंस्था) लग्नाला नकार दिला म्हणून एका तरुणाने रागाच्या भरात मुलीच्या घराला आग लावली. या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कडियाम मंडळच्या दुल्ला गावात घडली.
श्रीनू नामक १९ वर्षीय तरुणाचे गावातील नागमणी नावाच्या मुलीवर प्रेम होते. मात्र, नागमणीच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला. त्यामुळे श्रीनूने मध्यरात्री रागाच्या भरात तिच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावली. रात्रीची वेळ असल्याचे नागमणीचे कुटुंबीय झोपलेले होते. श्रीनूने आग लावण्या पूर्वी घरचा दरवाजा बाहेरुन बंद केला. त्यामुळे नागमनीच्या कुटुंबातील सदस्य बाहेर येऊ शकले नाही. या आगीत दोन चिमुकल्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर चारजण गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान या चौघांपैकी दोघांचा मृत्यू झाला. इतर दोन मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.