Home Cities जळगाव जळगावात प्रजासत्ताक दिनानिमित्त एकपात्री प्रयोगाचे आयोजन

जळगावात प्रजासत्ताक दिनानिमित्त एकपात्री प्रयोगाचे आयोजन


Karyakram

जळगाव प्रतिनिधी । प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जवान फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित एकपात्री प्रयोगाचे आयोजन रविवारी 26 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात होणार आहे.

विमर्श मुंबई प्रस्तुत “अशफ़ाक़राम” महान क्रांतिकारक शहीद रामप्रसाद ‘बिस्मिल’ आणि शहीद अशफ़ाक़ उल्लाह खान यांच्या जीवन व कार्यावर आधारित एकपात्री प्रयोगाचे लेखक सुधीर विद्यार्थी हे असून संपादन, दिग्दर्शन, एकपात्री अभिनय मनीष मुनी यांचा सहभाग आहे. तरी या कार्यक्रमाचा नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जवान फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी सैनिक ईश्वर मोरे व सामाजिक कार्यकर्ते अशफाक पिंजारी यांनी केले आहे.


Protected Content

Play sound