संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत यश

karate spardha

जळगाव, प्रतिनिधी | येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय संचलित कराटे वर्गातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे. त्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

 

जळगावात नुकतीच हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित राज्यस्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली. यात संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय संचलित कराटे वर्गातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यात दिपाली सावकार, प्रणिता साळुंके, जान्हवी कोळी, निलेश साळुंके, एहतेसाब पिरजादे, साई माळी या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, सिक्रन पिरजादे व प्रथमेश देवरे यांनी रौप्य तर सैफ पिरजादे याने कांस्य पदक पटकावले आहे.

या गुणवंत विद्यार्थ्यांचा संत ज्ञानेश्वर महाराज कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी प्रमाणपत्र व पदके देऊन गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक ज्ञानेश्वर पवार व प्रज्ञा बोदडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रसंगी संस्थेचे सचिव मुकेश नाईक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content