पारोळा तालुक्यात खतांच्या विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक

fraud

पारोळा प्रतिनिधी । शहरासह तालुक्यात युरिया या रासायनिक खतांचा तुटवडा झाला आहे. त्याचा गैरफायदा घेऊन काही कृषी केंद्र चालक युरिया हा जादा भावाने विकून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याची तक्रार एका शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांची ही फसवणूक थांबवावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामाचा पिक पेरा हा झाला आहे. कधी नव्हे तो एवढा रब्बीच्या फेरा असल्याचे अनुभवी शेतकरीचे म्हणणे आहे. परिणामी यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची मात्रा ही शेतीला लागत आहे. त्या अनुषंगाने शेतकरी हे कृषी दुकानांकडे खते घेण्यासाठी येत आहेत. त्यात कृत्रिम रित्या युरिया या खताचा तुटवडा बाजारात निर्माण झाला आहे. त्याचाच फायदा घेऊन काही कृषी दुकानदार शेतकरीना 280 ते 300 रुपयांप्रमाणे चढ्या भावाने युरिया विकत आहे. शेतकऱ्यांनी या संदर्भात पावती मागितली तर त्या शेतकऱ्याला युरिया शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. अशी तक्रार शेवगेचे शेतकरी सुभाष पाटील यांनी पंचायत समितीचे कृषी अधिकारी कडे केली आहे.विशेष म्हणजे काही दुकानदाराकडे युरिया शिल्लक असताना ते देतच नसल्याचे देखील तक्रार आहे. या गंभीर प्रकाराची तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी विभागाने तातडीने दखल घेऊन दुकानातील साठा तपासून चढ्या भावाने युरिया खतांची विक्री थांबवावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या शेतकरीने केली आहे.

Protected Content