शिवसेनेकडून कदाचित 2014 मध्येही सत्तास्थापनेचे प्रयत्न झालेच असतील : खडसे

eknath khadse

उस्मानाबाद (वृत्तसंस्था) आज एकमेकांच्या विरोधात तत्व आणि विचार असताना भाजपविरोधात सत्ता स्थापन झाली. कदाचित तसा विचार 2014 मध्येही झाला असावा. त्यामुळेच प्रयत्न झालेच असतील, अशा शब्दात शिवसेनेकडून 2014 मध्येही काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव आला होता, या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

अक्कलकोट स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर, एकनाथ खडसे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. शिवसेनेने भाजपला अंधारात ठेवण्याचा प्रश्नच नाही. कारण दोन्ही पक्ष 2014 मध्ये वेगळे लढले होते. त्यामुळे वेगळे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य शिवसेनेला होते. 2019 मध्ये आम्ही एकत्र लढूनही टोकाचे मतभेद झाल्या, त्यामुळे आजचे सरकार स्थापन झाले आहे, भाजपचे सरकार स्थापन झाले नाही, असे खडसेंनी नमूद केले. दरम्यान, भाजपने 2014 साली अल्प मतांवर सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेकडून आघाडीचे सरकार स्थापन व्हावे यासाठी प्रस्ताव आला होता. यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने माझ्याशी संपर्क साधला. मात्र, मी तो प्रस्ताव फेटाळून लावला होता, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते.

Protected Content