Home धर्म-समाज फैजपूर येथे लसीकरण मोहिमेचे नगराध्यक्ष होले यांच्याहस्ते प्रारंभ

फैजपूर येथे लसीकरण मोहिमेचे नगराध्यक्ष होले यांच्याहस्ते प्रारंभ

0
23


WhatsApp Image 2020 01 19 at 3.35.52 PM

फैजपूर, प्रतिनिधी | आज रविवार दि. १९ जानेवारी रोजी फैजपूर नगर परिषद हॉस्पिटल आयोजित राष्ट्रीय पोलियो लसीकरण कार्यक्रमात चिमुकल्यांना नगराध्यक्ष महानंदा होले यांच्या हस्ते पोलियो लस पाजून राष्ट्रीय पोलियो लसीकरण मोहिमेला फैजपूर येथे सुरुवात करण्यात आली.

 

० ते ५ वयोगटातील बालकांना राष्ट्रीयस्तरावर पल्स पोलिओ लस पाजण्यात येत आहे. यानुसार आज फैजपूर येथे पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. नगराध्यक्ष महानंदा होले यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आरोग्य सभापती नफीसाबी शेख इरफान, डॉ. रेखा पाटील, सविता काटे, प्रकाश सोनोवणे, अशोक चौधरी, टी. एन. चौधरी आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound