Home Cities एरंडोल शिवाजी महाराजांच्या नावावर दिलेली एकेरी नावे बदलण्याची मागणी

शिवाजी महाराजांच्या नावावर दिलेली एकेरी नावे बदलण्याची मागणी

0
104

kasoda 2

कासोदा, प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आधारित नाव देण्यात आलेल्या कॉलन्या, नगरे, बस स्टॉप यांच्या नावातील एकेरी उल्लेख काढून ही नावे आदरार्थी करण्यात यावी, अशी मागणी बांभोरी खुर्द येथील शिवसेना शाखाप्रमुख भारत चौधरी यांनी एरंडोल येथील नायब तहसिलदार व एरंडोल आगारप्रमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

नायब तहासिलदार रावसाहेब शिरसाठ यांना दिलेल्या निवेदनात तालुका क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने नगर, कॉलनी, शासकीय-निमशासकीय कार्यालय, रस्ते तसेच इतर काही उपक्रमांना देण्यात आलेली एकेरी नावे तसेच आगारप्रमुख दिलेल्या निवेदनात कासोदा येथील बसस्टॉपला दिलेले एकेरी नाव बदलण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. हे बदल येत्या १९ फेब्रुवारीपासून करण्यात यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. त्यावर लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील यांचीही स्वाक्षरी आहे. निवेदन देताना शिवसेना शाखा प्रमुख भारत चौधरी, लोकेश पाटील, अक्षय शिंपी व आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound