वादग्रस्त पुस्तकाचे वितरण थांबवा – मराठा समाजाची मागणी

muktainagar

मुक्ताईनगर प्रतिनिधी । ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ हे वादग्रस्त पुस्तक 8 दिवसांच्या आत भाजपने तात्काळ पाठीमागे घ्यावे’, अन्यथा ह्या पुस्तकाच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुक्ताईनगर ग्रामीण मराठातर्फे देण्यात आला असून यासंदर्भातील निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारण छत्रपती शिवाजी महाराज तडीपार नव्हते, त्यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल नव्हते. शिवाजी महाराज मुळात ते क्रूर नव्हते. मात्र दुसर्‍या बाजूला संपूर्ण उलट चित्र आहे. हे महाराष्ट्रासह देशाला माहित आहे. कारण त्यांच्यावर गुजरातमध्ये गुन्हे दाखल आहेत. भाजप शिवाजी महाराजांसोबत नरेंद्र मोदी यांची तुलना करून ‘काळा इतिहास पांढरा करण्याचा प्रयत्न करत आहेत.’ श्याम जाजू महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. ते गद्दार निघतील असे वाटले नव्हते. जाजू यांच्या डोळ्यासमोर शिवरायांशी तुला होत असताना ते मोदींच्या सत्तेपुढे इमान विकत बसले होते हे त्यातून स्पष्ट होते. शिवाजी महाराजांसोबत मोदी यांची तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा नरेंद्र मोदीसह कोणीही मोठा नाही. हे ‘वादग्रस्त पुस्तक 8 दिवसाच्या आत भाजपने तात्काळ पाठीमागे घ्यावे’. असा इशारा मुक्ताईनगर ग्रामीण मराठातर्फे देण्यात येत आहे. अन्यथा ह्या पुस्तकाच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. मात्र तीन पट फालतू लेखक नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करत असेल तरी ही शिवरायांच्या महाराष्ट्राची आणि त्यांच्या कर्तृत्वाशी भाजपने केलेली गद्दारी आहे.

भाजप दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. मात्र हा सोहळा नसून खोट्या इतिहासाचा व जाणीवपूर्वक केलेल्या विकृतीचा बाजार होता. हेच या पुस्तकाच्या शिर्षकावरून व चित्रावरून स्पष्ट होते.

निवेदन देतांना ॲड. पवनराजे पाटील, भागवत दाभाडे, हर्षल पाटील, वैभव पाटील, सचिन पाटील, शिवा भाऊ पाटील, दिनेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थिती होते.

Protected Content