चाळीसगाव प्रतिनिधी । आधार कायदेविषयक सहायता केंद्र आणि संभाजी सेना महिला आघाडीतर्फे कैवल्यनगर येथील गरीब वस्तीवर महिलांना स्नेहबैठकत साडी-चोळी वाटप करण्यात आले.
रथसप्तमीच्या दिवशी महिलांचा हा मनोमिलनाचा व आनंदी क्षणांचा सोहळा अगदी अकस्मितपणे पार पडला.संभाजी सेना विधी सल्लागार आणि आधार कायदेविषयक सहायता केंद्राच्या अध्यक्ष अॅड. आशा लक्ष्मण शिरसाठ गोरे यांनी वस्तीवरील गोरगरीब महिलांकरिता कैवल्यनगर यावस्तीचे कार्यक्रमासाठी स्थान निवडले व येथील वंचित महिलांना साडीचोळी, फळ, कापडी पिशव्या, दिनदर्शिका व तिळगुळ यांचे वाटप केले. यावेळी महिलांनी स्वतः चा परिचय देऊन, कौटुंबिक समस्यांना दूर सारून सखींसमवेत आपले मनमोकळे करत घटकाभर आनंदाचा श्वास भरला.
या गोरगरीब सखींच्या कौटुंबिक व सामाजिक अडचणींचा ठाव घेत अॅड.आशा शिरसाठ यांनी स्त्री ने तिचे सुखद क्षण व आंनदी भाव कधीही हरपू नये असे आवाहन केले.याप्रसंगी आधार व संभाजीसेनेच्या सौ.साधना शिरसाठ, सोनाली गवळी, विमल गवळी,रत्नाबाई कुमावत, अनुश्री गवळी,मंगल वाघ,उषाबाई ढवळे,ज्योति सूर्यवंशी, सुनंदा बोरसे,मंगल दळवी आदी उपस्थित होत्या.