मुंबई प्रतिनिधी । पंतप्रधान मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारा आज प्रकाशित झालेल्या पुस्तकाला गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे.
याबाबत वृत्त असे की, जय भगवान गोयल या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्याने आज दिल्ली प्रदेश कार्यालयातील धार्मीक व सांस्कृतीक संमेलनात एका पुस्तकाचे प्रकाशन केले. आज के शिवाजी-नरेंद्र मोदी या नावाने हे पुस्तक असून यात पंतप्रधान मोदी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला आहे. यात शिवरायांसोबत पंतप्रधानांची तुलना करण्यात आली असून यासोबत पुस्तकाच्या नावातच महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे या पुस्तकाला आता सोशल मीडियातून विरोध सुरू झाला आहे.
यातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याला विरोध केला आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट करून आपल्या मनाला हे काही पटत नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या पुस्तकाला आता विरोध वाढू लागल्याचे दिसून येत आहे.
जगा च्या अंता पर्येंत दुसरे #छत्रपतीशिवाजीमहाराज होणे नाही
–
"आज के शिवाजी नरेंद्र मोदी"
–
पटत नाही मनाला pic.twitter.com/ckEu9e22ZB— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) 12 January 2020