पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील उंदीरखेडा येथील तरुण शेतकऱ्याने त्याच्या स्वतःच्या शेतात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.
विशाल सुरेश महाजन (वय-31) रा. उंदीरखेडा ता. पारोळा या तरूण शेतकऱ्याने स्वतःच्या मुंदाणे प्र.अ. शिवारातील शेतात काहीतरी विषारी औषध सेवन करून पडलेला असतांना शेजारील शेतकरी दिलीप नाना महाजन, संतोष वना महाजन, प्रदीप भास्कर महाजन, यांनी धाव घेत त्याला खाजगी वाहनाने कुटीर रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी योगेश साळुंखे यांनी मयत घोषीत केले. दिलीप महाजन यांच्या खबरीवरून पारोळा पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रविद्र रावते करती आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परीवार आहे.