भुसावळ प्रतिनिधी । येथील बियाणी स्कूलच्या निवासी सैनिकी शाळेत क्रॉस कंट्री मैरेथान स्पर्धा आज सकाळी 10.30 वाजता उत्साहात पार पडली.
या स्पधेची सुरवात हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. स्पर्धचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव संगीता बियाणी व इतर मान्यवर यानी स्पर्धा हिरवा झेंडा दाखवून केली. या स्पर्धेत शाळेचे 800 विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा तीन गटात होती. प्रथम गटात मुलांमधुन रसूल फिरोज तडवी, द्वीत्तीय क्रमांक प्रणव सुभाष बारेला व तृतीय अमर रमेश बारेला तर मुलींमधून प्रथम रोशनी लक्ष्मण बारेला व द्वितीय शीतल कैलाश बारेला हया विजेता ठरल्या.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी सचिव संगीता बियाणी, राजीव पारीक, प्रवीण भराडिया व प्राचार्य डी.एम. पाटिल व इतर मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेसाठी वाहतूक नियंत्रणचे संदीप राजपूत, भाऊसाहेब पाटील, तालुका पुलिस स्टेशनचे अजय माळी, प्रवीण पाटील यांचे सहकार्य लाभले. स्पर्धा ही पाच किलोमीटर मध्ये घेण्यात आली.