भाजपा जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेत हाणामारी; सुनिल नेवे यांच्या अंगावर फेकली शाई (व्हिडीओ)

WhatsApp Image 2020 01 10 at 2.54.36 PM

जळगाव प्रतिनिधी । भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या उपस्थिती जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष पदाची निवड आज संत हरदास मंगलकार्यालयात होत आहे. अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर बैठकीत कार्यकर्त्यांचा चांगलाच गोंधळ झाला. भुसावळ शहराध्यक्ष निवडीवरून हा वाद झाला. वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. यात भाजपचे सरचिटणीस सुनील नेवे यांना मारहाण झाली असून त्यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

जळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष च्या निवडणूक प्रक्रियेमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, माजी मंत्री गिरीश महाजन व भाजपाचे आमदार उपस्थित असतांना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच भुसावळ येथील कार्यकर्त्यांनी आपला आक्षेप नोंदविला व याची दखल घेत असतांना काही कार्यकर्ते मंच सोडून भाजपाचे भुसावळ येथील नगरसेवक संघटन सचिव सुनील नवे यांच्या अंगावर शाई फेकली व तोंडाला लावली. त्यावेळेस भाजपाच्या उपस्थित गिरीश महाजन व रावसाहेब दानवे यांच्या अंगावर देखील शाई उडाली. धावपळीमध्ये अनेकांच्या अंगावर पडली. हा गोंधळ सुरू असताना रावसाहेब दानवे यांनी निवडणूकीचा कार्यक्रम सोडून निघून गेले. यावेळी गिरीश महाजन यांनी सर्वांना शांत करून निवडणुकीचा कार्यक्रम सुरू केला. दरम्यान भुसावळ शहराध्यक्ष निवडीसाठी एकुण ११ जण इच्छुक होते. इच्छुकांपैकी कोणाचीही निवड न झाल्याने संताप झाला आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/796963080818494/

Protected Content