यावल येथे विद्युत तार तुटल्याने खळबळ : न.पा. कर्मचारी बचावला

yawal wire accident

यावल, प्रातिनिधी | शहरातील मुख्य बाजार पेठेतील विद्युत वाहिनीचे तार अचानक तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत एक न.पा. कर्मचारी सुदैवाने बचावला आहे. शहरातील प्रमुख मार्गावरील चौकात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

 

या संदर्भातील अधिक वृत असे की, आज (दि.९) दुपारी ४.०० ते ४ .३० च्या सुमारास नगर परिषदेतील स्वच्छता विभागाचे कर्मचारी दुर्गादास गणेश चव्हाण (वय ५६) हे मोटर सायकलने नगरपालीकेत जात असतांना शहरातील खिर्नीपुरा नगिना मस्जिद समोरील विद्युत खांबावरील विद्युत पुरवठा करणारी मुख्य तार अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने तुटली व त्यांच्या मोटर सायकलला स्पर्श करून गेली. सुदैवाने चव्हाण यांनी तुटलेली तार आपल्या दिशेने येत असल्याचे पाहुन मोटार सायकलवरून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला आहे. या घटनेत चव्हाण यांच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे. घटना स्थळापासून चव्हाण यांना नागरिकांनी तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी वैधकीय अधिकारी बी.बी.पावरा यांनी त्यांच्यावर उपचार केल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले. हा रस्ता शहरातील नेहमीचा वर्दळीचा रस्ता आहे, मात्र घटना घडली त्या वेळी या परिसरात नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जावुन तुटलेल्या ताराची जोडणी केली.

Protected Content