भाजपच्या जळगाव जिल्ह्यातील मंडल अध्यक्षांची घोषणा

bjp

जळगाव, प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्यातील मंडल अध्यक्षांची घोषणा जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांनी केली आहे. जळगाव जिल्हा भाजपा कोअर समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊन  निर्णय करण्यात आला.

जळगाव जिल्हा भाजप कोअर समितीच्या बैठकीत मंडल अध्यक्षपदी पुढील प्रमाणे  निवड जाहीर करण्यात आली आहे. यात , चाळीसगाव शहर घृष्णेश्वर पाटील, चाळीसगाव ग्रामीण सुनिल निकम,  अमळनेर शहर उमेश वाल्हे , अमळनेर ग्रामीण  हिरालाल पाटील, पाचोरा शहर रमेश वाणी , पाचोरा ग्रामीण अमोल शिंदे यांची निवड करण्यात आली. तर  पारोळा अतुल मोरे , भडगाव अमोल पाटील , एरंडोल मच्छिद्र पाटील,  जळगाव ग्रामीण गोपाळ भंगाळे , यावल उमेश फेगडे, रावेर राजन लासूरकर , भुसावळ शहर दिनेश नेमाडे,  भुसावळ ग्रामीण भालचंद्र पाटील, मुक्ताईनगर रामभाऊ पाटील , बोदवड विनोद कोळी, जामनेर चंद्रकांत बाविस्कर, चोपडा शहर गजेंद्र जैस्वाल , चोपडा ग्रामीण पंकज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व नियुक्त्या जळगाव जिल्हा सहाय्यक निवडणुक अधिकारी डॉ.विजय धांडे यांनी घोषित केल्या आहेत. याप्रसंगी  माजी मंत्री आ.गिरीष महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, विभाग संघटन मंत्री अॅड. किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, खा.रक्षा खडसे, खा.उन्मेष पाटील, प्रदेश चिटणीस आ.स्मिता वाघ, आ.संजय सावकारे, आ.राजुमामा भोळे, आ.चंदूभाई पटेल, आ.मंगेश चव्हाण, ना.हरिभाऊ जावळे, बेटी बचाव बेटी पाढाव राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा संघटन सरचिटणीस  प्रा. डॉ.सुनिल नेवे, सरचिटणीस पोपटतात्या भोळे, सदाशिवआबा पाटील, अॅड. रोहिणी खडसे- खेवलकर, हर्षल पाटील उपस्थित होते.

Protected Content