Home Cities यावल जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेचा निकाल : जे. टी. महाजन स्कुलला यश

जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेचा निकाल : जे. टी. महाजन स्कुलला यश

0
37

1

 

फैजपूर प्रतिनिधी । अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघ संलग्नित ‘जळगाव जिल्हा कलाध्यापक संघ जळगाव’ तर्फे आयोजित ‘जिल्हास्तरीय भव्य रंगभरण स्पर्धा’चा निकाल नुकताच जाहिर झाला असून या स्पर्धेत जे.टी. महाजन सेमी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली कला सादर केली. पण या जिल्हास्तरीय भव्य रंगभरण स्पर्धेत जे.टी महाजन सेमी इंग्लिश मेडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सदरील स्पर्धेच्या केंद्र स्तरावर गटांतर्गत सुवर्ण पदकांवर शिक्कामोर्तब केला. त्यात विद्यालयातील इयत्ता १ लीचा विद्यार्थी कार्तिक गणेश तायडे याने स्पर्धेच्या केंद्र स्तरावर “पहिल्या गटात” सुवर्णपदक, इयत्ता ३ रीचा विद्यार्थी अनिकेत प्रकाश सोनवणे व मारिया अमीर तडवी या दोघांनी “दुसऱ्या गटात” सुवर्णपदक पटकावले. तर याच केंद्र स्तरावर “तिसऱ्या गटातही” इयत्ता ५ वीचा विद्यार्थी ज्ञानेश जयंत बोरोले याने सुवर्णपदक मिळवले आहे.

विद्यालयाचे प्राचार्य मोजेस जाधव (इंग्लिश मेडिअम) व प्राचार्य नंदकिशोर सोनवणे (सेमी इंग्लिश मेडिअम ) यांच्या हस्ते या यशवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमवेत सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मोझेस जाधव व प्राचार्य नंदकिशोर सोनवणे यांनी सन्मानित विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत इतर सर्व विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा मिळावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका भाग्यश्री चौधरी यांनी केले.


Protected Content

Play sound