जळगाव (प्रतिनिधी) सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व जैन स्पोर्ट्स अकॅडमी च्या माध्यमाने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी बुद्धिबळच्या स्पर्धा कांताई सभागृहात पार पडल्या. तर कॅरम,टेबल टेनिस, स्विमिंग,मॅरेथॉन स्पर्धा देखील होत आहेत.
आज कॅरम १३ फेब्रुवारी रोजी टेबल टेनिस स्पर्धा दुपारी ४ वाजता जिल्हा पेठ मित्र मंडळ सभागृह येथे तर १४ फेब्रुवारी सकाळी ९ वाजत स्विमिंग च्या स्पर्धा पोलीस जलतरण तलावावर होतील. मॅरेथॉन स्पर्धा १७ फेब्रुवारी रोजी तर महिलांची मोटार सायकल रॅली १८ फेब्रुवारी सकाळी ठेवण्यात आली आहे. वरील स्पर्धेबाबत स्पर्धा आयोजन प्रमुख फारूक शेख ९४२३१८५७८६ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन शिव जयंती सार्वजनिक महोत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे.