Home Cities जळगाव भारतीय पत्रकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी हेमंत काळुंखे

भारतीय पत्रकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी हेमंत काळुंखे

0
38


hemant salunkhe

जळगाव प्रतिनिधी । भारतीय पत्रकार महासंघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी (शहरी) ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी विलास पाटील यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. चोपडा येथील हॉटेल जयेश फॅमिली लॉनच्या हिरवळी येथे झालेल्या पत्रकार दिनाच्या सोहळ्यात महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नवलसिंग राजपूत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. तसेच त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल हेमंत काळुंखे व विलास पाटील यांच्यावर वृत्तपत्रसृष्टीतून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound