यावल, प्रतिनिधी | येथील नगर परिषदव्दारे शहर स्वच्छता अभीयान या कार्यक्रमाअंतर्गत नागरीकांना स्वच्छतेचे महत्व पटवुन देण्याकरिता शहरातील विविध सार्वजनिक ठीकाणी पथनाट्य व्दारे जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत असुन या कार्यक्रमास शहरवासीयांकडुन चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यावल नगर परिषदच्या माध्यमातुन राष्ट्रीय कार्यक्रम स्वच्छ भारत सुंदर भारत या अभियानाव्दारे नागरीकांमध्ये स्वच्छतेचे महत्व पटवुन देण्यासाठी जळगाव येथील तुळजाई संस्था आणी स्वराज्य गृप यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाटय व्दारे नागरीकांमध्ये स्वच्छतेचा प्रसार प्रचार करण्यासाठी सुंदर असे पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. हे अभियान काल मंगळवार ७ जानेवारीपासुन सुरू करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्वच्छता अभियान पथनाट्याचे शहरातील सार्वजनिक ठीकाणी या पथनाटयाचे सादरीकरण करण्यात येणार असुन , यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या उपस्थितीत या पथनाटयाची सुरुवात करण्यात आली. या पथनाट्यात तुळजाई संस्था आणी स्वराज्य ग्रुप जळगाव यांच्या या जनजागृती पथनाट्याचे व्यवस्थापक भुषण लाडवंजारी, यांच्या मार्गदर्शनाखाली विकास वाघ, चंद्रकांत इंगळे, विनोद पाटील, करन मानकर, निलेश लोहार यांनी सहभाग घेत आहे.