यावल प्रतिनिधी । तालुक्यातील भालोद येथील न्यु इंग्लिश स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांना त्यांना प्रामाणिकपणे सापडलेली ४ हजार २३० रुपयांची रोक रक्कम परत केल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भालोद येथील विद्यालयातील दोन विद्यार्थी ज्ञानेश्वर दिलीप चौधरी (६ वी) व मिलिंद हिरामण पाटील (८ वी) हे शाळा सुटल्यानंतर शाळेच्या आवाराच्या बाहेरील गावातील चौकामध्ये प्रत्येकी २ हजार ५३० व १ हजार ७०० रुपये अशी रक्कम सापडली असता ह्या विद्यार्थ्यांनी शाळा सुटल्यानंतर शाळेतील उपशिक्षक डी.व्ही.चौधरी हे येत असताना त्यांना या मिळुन आलेल्या पैशांची माहीती सांगीतली व सापडलेली रक्कम ज्यांची असेल त्यांना परत करावी असे सांगितले.तसेच या व्यतिरिक्त १००० रुपये गावातील रहिवासी डिगंबर बळीराम कुंभार यांनासुद्धा सापडले होते त्यांनीसुद्धा प्रामाणिकपणे ही रक्कम आणून दिली.ही सर्व रक्कम एका ट्रक ड्रायव्हरची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सदर रक्कम उपस्थित नागरिकांच्या समोर त्या व्यक्तीला परत करण्यात आली.
या प्रामाणिक विद्यार्थ्यांचे संपूर्ण गाव, शाळेचे संस्थाचालक शिक्षकांकडून गावातील ग्रामस्थ मंडळी कडुन विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुकही करण्यात आहे.विद्यार्थ्यांनी दाखवीलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल डी.व्ही.चौधरी यांनी स्वतःकडून दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० रुपये बक्षीस दिले.