Home राजकीय नानकाना साहिबवर झालेला हल्ला निंदनीय-राहूल गांधी

नानकाना साहिबवर झालेला हल्ला निंदनीय-राहूल गांधी

0
34

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पाकिस्तानातील नानकाना साहिब गुरुद्वारावर कट्टरपंथीयांनी केलेल्या हल्ल्याचा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी निषेध केला आहे.

नानकाना साहीब हल्ल्याबाबत राहुल गांधी यांनी आज ट्विट करून निषेध केला आहे. यात ते म्हणाले आहेत की, नानकाना साहिब गुरुद्वारावर झालेला हल्ला निंदनीय आहे आणि त्यांचा निषेध केलाच पाहिजे. कट्टरता ही धोकादायक आणि जुने विष आहे, तिला कोणतीही सीमा नाही. प्रेम + एकमेकांचा आदर + समजणे हेच एकमेव औषध आहे. असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

पाकिस्तानात गुरु नानक यांच्या जन्मस्थळी ही गुरुद्वारा बांधण्यात आली आहे. तिचे पावित्र्य कायम राखण्यासाठी पाकिस्तान सरकारने योग्य ती पावले उचलावी असे भारताने म्हटले आहे. पूर्वी भारतात असलेले हे ठिकाण फाळणीनंतर पाकिस्तानात गेले. या गुरुद्वारा प्रमुखाची मुलगी जगजीत कौर हिचे तिच्या घरातून अपहरण करून धर्मांतर करण्यात आल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा वाद धुमसत होता. या मुलीचे अपहरण केल्याचा ज्याच्यावर आरोप आहे त्या मुलाच्या कुटुंबीयांनी नानकाना साहिबवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केल्याचे काल दिसून आले असून याचा व्यापक प्रमाणात निषेध होत आहे.


Protected Content

Play sound