Home क्रीडा धरणगाव महाविद्यालयातील तीन खेळाडूंची अश्वमेघ स्पर्धेसाठी निवड

धरणगाव महाविद्यालयातील तीन खेळाडूंची अश्वमेघ स्पर्धेसाठी निवड

0
109

धरणगाव (प्रतिनिधी) येथील तीन खेळाडूंची निवड मुंबई विद्यापीठात होणाऱ्या अश्वमेध स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. येथील महाविद्यालयातील हे तीनही खेळाडू बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघातून खेळणारे आहेत.

कु. नेहा प्रकाश पाटील, रुचीका प्रकाश मराठे व संकेत तेजेंद्रसिंह चंदेल अशी या खेळांडूची नावे आहेत. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण कुळकर्णी, सचिव डॉ. मिलींद डहाळे यांच्या हस्ते या खेळाडूंचा नुकताच सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उद्योजक सुरेश चौधरी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख व माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, प्राचार्य खोंडे, क्रीडाशिक्षक दिपक पाटील, ओस्तवाल आदी उपस्थीत होते. त्यांना सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound